Saturday, October 10, 2009

पुणेरी बंगलोर

किस्सा १: मस्त पाऊस पडतोय. रस्त्यात एक हॉटेल दिसलं. मी आणि अनिश गरम गरम भजे आणि चहासाठी त्या हॉटेलमधे शिरलो. काउंटरवरून कूपन घेऊन किचनमधे दिलं. किचनमधल्या माणसाने फ़क्त भजे दिले.
मी: चाय नहीं है क्या?
त्या माणसाने वाकडीतिकड़ी मान हलवली
मला वाटल चहा संपलाय म्हणून मी काउंटरवर गेलो
मी: "चाय नहीं है"
काउंटरवाला आतल्या माणसाला काहीतरी बोलला: "^%&*^ (769&^&*^(^"
काउंटरवाला: "साब चाय है"
मी: "फिर वो दे क्यों नहीं रहा"
काउंटरवाला: "पहेले पकोड़े खाओ फिर चाय"
मी: "क्यों साथमे नहीं खा सकते क्या?"
काउंटरवाला: "खा सकते हो"
मी: "तो फिर दो, हमें साथमे खाना है दोनों"
मग त्या काउंटरवाल्याने आतमध्ये सोबत चहापण द्यायला सांगितला

किस्सा २: रविवारची सकाळ. मी आणि अनिश बाहेरून ब्रेकफास्ट करून घरी येत होतो. रस्त्यात एका बिल्डिंगच्या खिडकीतुन खाली एक दोरी लटकताना दिसली. म्हणून आम्ही निट पाहिलं तर एक मावशी खालच्या भाजिवाल्याकडून भाजीची शोपिंग करत होत्या. काय इनोवेटिव कल्पना होती. त्यांनी खाली दोरी सोडली आणि त्या भाजीवाल्याने एका पिशवीत भाजी ठेवून ती पिशवी दोरीला बांधली. मग त्या मावशिंनी ती पिशवी वर खेचून घेतली. (पैशांचा व्यवहार कसा झाला कोणास ठाऊक)

किस्सा ३: हिमांशु रविवारी कसलीतरी प्रिंटआऊट काढायला बाजुच्या साइबर कैफे मध्ये गेला. आणि तसाच परत आला.
मी: काय रे काय झालं?
हिमांशु: तो १०रु म्हणत होता
मी:का?
हिमांशु: आज सन्डे आहे म्हणून...:D :D :D

किस्सा ४: आमच्या कंपनी जवळच्या चौकात एक पाटी आहे. "Please do not wash your vehicles here"

वाटलं ना मी पुण्यात राहतो. हे सगळे पुण्यातले नाहीं, बंगलोर मधले प्रसंग आहेत. मला फार दिवसांपासून असं खटकतचं होतं....बंगालोरमध्ये एक सुप्त पुणे लपलयं.
अर्थात मी काही पुण्याचा नाहीये. त्यामुळे माझं पुण्याबद्दलचं ज्ञान ऐकीव माहितीवर आहे. लहानपणी पुण्याबद्दल मी जे ऐकलं होतं त्यावरून माझी पुण्याबद्दलची कल्पना म्हणजे, असे गोरे गोमटे, धोतर नेसून कपाळाला गंध लावलेले, अतिशय शुद्ध मराठी बोलणारे गोंडस लोक असतील अशी होती. पण जेव्हा पहिल्यांदा पुण्याला गेलो...स्टेशन बाहेर पाय ठेवला आणि........अरे राम....... (थोडक्यात माझ्या बाल मनावर पहिला विपरीत परिणाम पुण्यात झाला, पुढे ते इतर विपरीत परिणामांनी सुदृढ़ होत गेलं.....असो...विषयांतर होतयं)

तरी बंगलोरच्या रिक्षावाल्यांचे किस्से नाही सांगितले.....actually it deserves separate post. आत्ता एक किस्सा आठवला तेवढा सांगतो. संध्याकाळी कुठेतरी जायचं होतं. संध्याकाळ म्हणजे ७.३० वगैरे झाले असतील (रिक्षावाल्यांच्या दृष्टीने नाईट अवर्स)
जीथे जायचं होतं तिथे जायला मिटरने साधारणतः ४०रु होतात. एका रिक्षावाल्याला विचारलं येणार का? तो बोलला डबल मीटर. मी म्हटलं का रे बाबा? तर म्हणे नाईट अवर. म्हटलं मग दीडपट घे डबल का? तर वर तोंड करून म्हणतो कसा. वो तो बाकी लोग के लिए है... आपकेलीये डबल.

पुण्याचं पुणेरिपण सांगणारी गोष्ट म्हणजे तिथल्या पाट्या. बंगालोरेमध्येपण अशा असंख्य पाट्या आहेत. कन्नड़ अगदी थोडीच वाचता येत असल्याने कन्नड़ पाटयांचं रसग्रहण नाहीं करू शकलो पण इंग्रजीत देखिल पाट्या लिहिताना लोकानी काय काय मजा केल्यात. आमच्या घराच्या बाजुलाच एक पाटी आहे. वरती कोणाचतरी नाव आहे आणि खली Astrologer and Panicker. मला अजून कळलं नाहीये Panicker म्हणजे नक्की काय? लोकाना भविष्य सांगुन Panic करतात की काय? आता त्या 'Please do not wash your vehicles here' पाटीचचं घ्या. पहिली गोष्ट म्हणजे चौकात नळ लावलाच कोणी? बरं लावला तर लावला, पण नळ आहे म्हणून काय लोकं चौकात गाड्या थांबवून धुणार आहेत काय?

जर कन्नड़ न येता चालता बोलता एवढे प्रसंग अनुभवास येत असतील तर कन्नड़ निट यायला लागल्यावर काय मजा येइल. माझी अशी फार इच्छा आहे की व्यवस्थित कन्नड़ यायला लागल्यावर मल्लेश्वरम (म्हणजे पुण्याची सदाशिव पेठ) मध्ये जाउन एक आठवडा रहायचं. काय काय मजा असतील तिथे.

1 comment: