Tuesday, October 13, 2009

प्राण्यांच जग

आत्ता ऑफिसमधे येताना, रस्त्याच्या मध्यभागी एक गाय बसलेली. समोरून एक लैंड क्रुझर आली. ती जवळ येताच हॉर्न मारायच्या आधीच ती गाय लगबगीने उठून रस्त्याच्या कडेला गेली. च्यायला नाहीतर कधी कधी काही गाई असल्या बैलोबा असतात की समोर गाड़ी उभी करून कितीही हॉर्न मारा बिलकुल हालत नाहीत...
शहरात राहणाय्रा प्राण्यांचं जग कसं असेल?
मलातरी वाटतं त्यांच्या दृष्टीने ह्या जगात आपले आप्त स्वकीय, इतर मानवेतर प्राणी, माणूस, आणि ह्या गाड्या हे सगळे एकच असतील . सीरियसली त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या हे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वाटत असणार. क्वॉलिस, होंडा सिटी, मारुती ८०० असले वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी. त्यातले काही ४ पायी तर काही २ पायी. म्हणजे माणूस, बाइक्स आणि सायकलस हे द्विपद तर वेगवेगळ्या आकार प्रकाराच्या ह्या रंगेबिरंगी गाड्या हे चतुष्पद. (काही प्राणी रंगांधळे असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी ही मजा नही, पण चित्र विचित्र आकार पाहून त्यांना नक्कीच मजा येत असणार) . बरं आपल्याला जशा सगळ्या गाई, सगले बैल, सगळे कुत्रे सारखेच वाटतात (निदान मला तरी, माझ्या रूममेटला चेहर्यावरून आमच्या एरिया मधले सगळे कुत्रे ओळखता येतात). तसं एकाच प्रकारच्या गाड्या ह्या सारख्या दिसत असूनही त्यांना काही प्रश्न पडत नसणार. मोठे प्राणी तर छोट्या गाड्यांना बिलकुल जूमानत नसणार. म्हणजे रस्त्यावर बसलेली म्हैस ही स्विफ्ट, सेंट्रो वगैरे असल्या छोट्या प्राण्यांना भाव पण देत नसेल तेच बस किंवा ट्रक असले मोठे प्राणी पाहुनच मनात धड़की भरत असेल. मुंबईमधे तर लोकल ट्रेन हा अजस्र आणि खतरनाक प्राणी असेल. (मुंबईचा ऍनाकोंडा)
कधी शहरातले आणि खेड्यातले प्राणी जेव्हा एकमेकाना भेटत असतील तेव्हा कसल्या गप्पा रंगत असतील ना .... जसं आपल्यासाठी खेड्यात आणि जंगलात जैवविविधता (biodiversity) असते तसे खेड्यातल्या प्राण्यांच्या दृष्टीने शहरात कितीतरी जैवविविधता असेल. टेंभेवाडी(बुद्रुक) मधल्या कुत्र्याच्या दृष्टीने मुंबई म्हणजे अमेझॉनचं जंगलच.

बास् आवारा आता.......एक्च्युँली झालय काय, आज सकाळी सकाळी पहाटे ७.१५ ला उठालो आणि ८.२८ ला ऑफिसला टच झालो त्यामुळे येवढ्यालवकर ऑफिसमधे येउन काय करावं हे कळत नव्हतं आणि दुसरं म्हणजे रोज १० वाजेपर्यंत ऑफिसला येणार्या लोकांनी रस्त्यातल्या सगळ्या गाई म्हशी उठऊन टाकलेल्या असतात त्यामुळे मला हे दृश्य रोज दिसत नाही .... आता रोजची वेळ झालीये .... कामाच्या पाट्या उचलल्या पाहिजेत......

1 comment:

  1. parya....mala pan adhi vatayacha ki pranyana gadya ekhadya pranya sarakhya vatat asatil mhanun.....pan tasa asata tar kutryani apalya peksha itakya mothya disnarya pranyachya payavar TAANG var karayachi himmat keli nasati...

    ReplyDelete