Wednesday, June 16, 2010

वाढदिवस सेलिब्रेशन

11 am @ office
आज माझा वाढदिवस........ :) :D =))


मग?...


चला काम करा.... :(

Tuesday, March 9, 2010

नवा मॅनेजर

माझा नवा मॅनेजर वेडा आहे. काल मला टीम मीटिंगनंतर थांबवून घेतलं आणि छोट्या मुलाला समजावून सांगावं तसं काय काय सांगत बसला. काम करण्यासाठी मोटिवेट करत होता.......आणि म़ी पण सिरिअसली ऐकत होतो (:D, ;), =)), LOL, ROFL)

बिचाऱ्याला काय माहीत...वो जिस स्कूल में पढ़ा है, उस स्कूल में हम कभी गयेही नही है.......काही खरं नाही त्याचं आता...बिचारा पस्तावणार मला टीम मधे घेऊन.

अशी पाखरे येती.....

आज हे का लिहितोय? माहीत नाही .... बस लिहावसं वाटतंय.

बालपणा पासूनच अनेक लोकं आपल्या मनात घर करायला सुरुवात करतात. सुरुवातीला आपलं विश्व आई बाबांनी व्यापलेलं असतं. पुढे शेजारचा किंवा शालेतला एखादा मित्र किवा मैत्रिण अतिशय जिवलग होतो/होते. पुढे जसं प्रौढ़ होत जातो तसं बऱ्याच लोकांमध्ये वावरायला लागतो, बऱ्याच जणांशी बोलतो, ओळखी होतात, मैत्री होते......पण फारच थोड़ी लोकं मनात घर करून रहातात. ही लोकं कधी कशी मनात येउन रहातात हे स्वतःला पण कळत नाही. एखादा प्रसंग असा होतो, एखादं भांडण असं होतं की जे मनाला चुटपुट लावून जातं.....कितीही आय डोंट केयर, आय डोंट केयर म्हटलं तरी एवढ्या वेळा स्वतःच्या मनाला समजवावं लागतं ह्यातच सर्व आलं.

तो एखादा अगदी २ मिनितांसाठी ट्रेन मधे दिसलेला सुन्दर बासरी वाजवणारा आंधळा भिकारी (खरं म्हणजे भिकारी हा शब्द फारच चुकीचा आहे, पण दुसरा नाही सापडतेय) असेल किंवा पहिली ते दहावी आपल्या शेजारी एकाच बाकावर बसलेला मित्र असेल किंवा एखादा इ-मेल आयडी असेल. अशी लोकं फार वाईट असतात. सवय लावून अचानक निघून जातात. परंतू अशी लोकं आयुष्यात मिळणं हे फार मोठं भाग्य असतं. प्रत्येकवेळी तुम्ही समृद्ध होता. सुदैवाने मला देवाने खूप श्रीमंत बनवलय.

म़ी फारच senti झालोय वाटते ...... but yes dears it makes a lots of difference for me.

अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती......अशी पाखरे येती........

Monday, December 14, 2009

स्वतंत्रता दिवस

वाह आज सकाळी आल्या आल्या काय न्यूज़ मिळालीये. माझी टीम चेंज झालिये. आता दुसर्या वेगळ्या टीम मधे काम करणार. सावरकरांना अंदमानाहून सुटल्यावर जेवढा आनंद झाला नसेल तेवढा मला झालाय. :) आज सगळीकडे कसा आनंदी आनंद आहे. (माझ्या वाईट परफौरमंस मुळे मला फालतू टीममधे तर टाकलं नाही ना, असला विचारपण मनाला शिवला नाहीये अजून :P)
तसं जुन्या टीम मधले लोक वाईट होते किंवा नविन टीममधले लोक चांगले असतील असं काही नाही. पण तरी काय झालं. आता सगळ्या ऑफिसमधल्या कामाला कसा नवा संदर्भ लाभणार. आता नव्या जोमाने चैटींग करता येइल, दर अर्ध्या तासाने नव्या संदर्भाने कॉफी पिता येइल. लंचच्या वेळेस गप्पा हाकायला नवे लोक मिळतील.....वाह वाह.....

ह्या अनंदा प्रित्यर्थ, आमच्या घरी आज संध्याकाळी सर्व ओळखी-अनोळखी मित्र-मैत्रीणीना ट्रीट देण्याचे आयोजिले आहे. आपणा सर्वानी लाखो-करोडोंच्या संख्येने उपस्थित राहून आम्हास कृतकृत्य करावे ही विनंती.
(आहेर आणून आमचा आनंद द्विगुणित केला तरी चालेल, आम्हास राग येणार नाही)

Thursday, December 10, 2009

डुक्कर

'डुक्कर गोंडस असतं'. हे वाक्य ऐकून १०० पैकी ८५ लोकं हसतील. खरोखर डूकरांवर फार अन्याय होतो. सारखे हिडीसपिडीस करतात बिचार्याला, कोणीच भाव देत नाहीत. वास्तविक किती बिचारा प्राणी असतो. त्याचा तिटकारा वाटायचे कारण एकच, की तो नेहमी घाणेरड्या ठिकाणी लोळत पडतो. पण घाण करतो कोण? डुक्कर स्वतः येवून घाण करून त्यात लोळत पडतात का? माणुसच करतो ना घाण? म्हणजे आपण स्वतः घाण करायची आणि दुसरा तिथे आला तर तो वाईट. बिचार्याना काय हौस आहे का गटारीत जाऊन झोपायची. तुम्ही सगळ्या गटारी वरुन बंद करा, सगळे ऊकिरड़े, कचरा इकडे तिकडे सांडू न देता व्यवस्थित कच्रराकुंडीत ठेवा, मग बघा कसं शहाण्यासारखा वागतो डुक्कर.

वास्तविक डुक्कर हा कुत्र्याप्रमाणे स्वतःहून गल्ल्यांमधे मोकाट फिरणारा प्राणी नाहीये. पोसायचा भुर्दंड नको अशा स्वार्थी विचाराने खाटिक लोक बिचार्याना वाऱ्यावर सोडून देतात. मग बिचारे अनाथासारखे गल्लोगल्ली भिक्षांदेही करत फिरतात. लोकं पूर्वग्रहामुळे त्यांना भिक्षाही देत नाहीत, आणि शेवटी नाईलाजाने ते वाममार्गाकडे वळतात. कुत्र्यांचं तसं नाहीये. त्यांनी मनात आणलं तर एखाद्या चांगल्या घरमालकाला किंवा मालकिणीला पटवून त्यांच्या घरी आरामात दिवस काढू शकतात. पण नाही. मग गल्लीतल्या कुत्रिंवर लाइन कशी मारता येइल? आणि मग ते असेच रस्त्यावर रहाणं पसंत करतात. त्यांचा हा भोंदूपणा माणुस लक्षातच घेत नाही.

देवाने डूकरांना फार छान रुपडं दिलेलं नाही, पण तरी ते अंगापिंडाने कसे गुबगुबीत असतात. त्यांची छोटी छोटी पिल्लं तर अगदी मांजरीच्या पिल्लांसारखी दिसतात. स्वभावाने देखिल ते मांजर किंवा कैट जमातीतील कोणत्याही प्राण्यासारखी मानी असतात. स्वतःहून कधीच माणसांजवळ जाणार नाहीत. एवढा अन्याय होउनही अतिशय स्थितप्रज्ञ राहून सगळीकडे वावरत असतात. एखाद्या संन्याशासारखे कसलीच अपेक्षा न ठेवता प्राप्त परिस्थितीत गुजराण करत असतात. त्यांची परिस्थितीशी लढा देण्याची वृत्ति मला फार आवडते. डुक्कर हा मुळातला जंगलातला प्राणी. इतर कोणत्याही पूर्वीच्या जंगली व आता माणसाळवलेल्या प्राण्यावर एवढा अन्याय झाला असता तर तो प्राणी केव्हाच हिम्मत हारून वापस जंगलात पलून गेला असता. पण डूकरांचे तसे नाही. ते शेवटपर्यंत लढा देत रहातात. स्वच्छ जागा, घाणेरडी जागा, उकिरडा कसलीही तमा न बाळगता स्वच्छंदीपणे बागडत असतात. निर्भेळ आनंद लूटत असतात. खरोखर निरपेक्ष आनंद लुटण्याच्या वृत्तीचे त्यांना प्रतीक मानले पाहिजे. म्हणजे नेहमी आनंदी राहणार्या माणसाबद्दल आपण म्हटले पाहिजे, "बाबुकाका नेहमी डूकरासारखे आनंदी असतात". (हे वाक्य वाचून पुन्हा काही दुर्जन लोकं हसतील, असो, हसतील त्यांचे दात दिसतील).

परदेशातील डूकरांच्या परिस्थितिविषयी मला जास्त माहिती नाहीये. पण बहुतेक त्यांना थोड़े बरे दिवस बघायला मिळत असावेत. पोल्ट्री फार्ममधल्या कोंबडयाचा जसे खायला उपयोग करेपर्यंत लाड करतात, तसेच तिथे डूकरांचेपण करतात बहुतेक. आपल्या इथल्या खाटीक लोकांना ते सुद्धा जमत नाही. म्हणजे कोंबद्यांचे लाड करतात पण डूकरांना वाऱ्यावर सोडतात. हा दुटप्पीपणा का?

मला वाटलं होतं की निदान काही मुलींनातरी डुक्कर क्यूट वाटत असेल. (कारण मुलींना कुठलीही गोष्ट क्यूट वाटू शकते). एकदा आम्ही मित्र-मैत्रिणी माथेरानला गेलो होतो. तिथे बरीच माकडे होती. जवळपास सगळी माकडं अतिशय कृष, ज्यांना धरून दोन थोबाडीत माराव्या अशी होती. तर ह्या मुली त्या माकडांना पाहूनपण हाऊ क्यूट, हाऊ क्युट करत होत्या. म्हणून मग मी काही मैत्रिनींना विचारलं, तर एकीलापण डुक्कर क्यूट वाटत नव्हता. आता बोला! म्हणजे बिचारा अन्याय सहन करण्यासाठीच तयार झालाय.

म्हणून माझं समस्त मानव जातीला आवाहन आहे. कृपया ह्या गरीब प्राण्याबद्दल नव्याने, कोणताही पूर्वग्रह मनात न बाळगता विचार करा. आपणच त्यांच्यापुढे वाईट परिस्थिती निर्माण करायची आणि त्यांनाच वाईट वर्तणुकीबद्दल नावं ठेवायची हे काही बरोबर नाही. ह्या बद्दल निषेध म्हणून स्वाईन फ्लुच्या निमित्तानेतर त्यांनी आपल्याला दणका दिला नाहीना? म्हणून म्हणतो एकदा विचार कराच. त्यांच्यावरील अन्यायाची भरपाई म्हणून प्रत्येकाने घरात निदान एक तरी डुक्कर पाळायलाच हवा.

खालील कविता डूकरार्पण......

मी एक डुक्कर महान
मज नाही आवडत ही घाण

होतो सुखी मी वनात त्या
का सोडले शहरात आणून ह्या
घरात आसरा न देई कुणी
बाहेरही घाणीच घाणी

मी एक डुक्कर महान

फिरलो शहरभर सैरभैर
परी नाही सोडला हा धीर
लोळलो गटारात आनंदी
बागडलो उकिरडयावरी स्वच्छंदी

मी एक डुक्कर महान

मागणे एकच हे खाटीका
जगुद्या सुखाने शेवटच्या घटिका
केले जरी जगाने हिडीसपिडीस
शेवटपर्यंत तरी लढूच लढूच लढूच.........

( सौजन्य: डूकरांचे गौरवगीत)

Wednesday, November 25, 2009

क्रेडिट कार्ड

आज एका क्रेडिट कार्डवाल्याचा फ़ोन आलेला. असलं डोकं खाल्लं त्यानी. जाम वैतागलो. नकोय क्रेडिट कार्ड सांगितल तरी पिडायला लागला. शेवटी मीच फ़ोन कट केला. रोज दिवसभरात कमीतकमी २-३ बैंक्स कडून क्रेडिट कार्ड विषयी फ़ोन येतो. सर तुम्हाला प्लेटिनम कार्ड ऑफर करतोय वगैरे वगैरे...सुरुवातीला नविन नविन मी पण काही बैंक्सच्या क्रेडिट कार्डसाठी अप्लाय केलं. पण दरवेळी कोणत्यातरी क्रायटेरिया मधे बसत नाही म्हणून रिजेक्ट करून माझाच पोपट करायचे. शेवटी मी नादच सोडला.
तर संध्याकाळी घरी जाता जाता मनात विचार आला, ह्या क्रेडिट कार्डवाल्यांनाच पकवलं तर.......काय आसुरी आनंद मिळेल. :D .

तर प्लान असा आहे.

creditcard person: Hello, Good morning sir, Is it Mr. Parag Shankar?

me:
no

(अर्ध्यावेळा हे क्रेडिट कार्ड वाले माझ चुकिचच नाव घेतात, तरीसुद्धा जनरली मी हो म्हणतो, पण आज नाही......आज चांगलाच घेणार ह्याला).....
मग तो बावचळणार, थोड्या पॉज नंतर,

creditcard person:
but sir our system shows ur name is parag shankar

me: shankar is my dad, my name is parag kulkarni

creditcard person:
ohhh sorry Mr. Parag Kulkarni. I am calling from xyz bank, can i speak to u now?

me: regarding?

creditcard person: Sir our bank is offering you a platinum credit card. With this u'll have credit limit upto 5 lakh rupees sir. also u'll have 5% cash back on any goods u purchase from any departmental store in the city, 2% chash back on all petrol pump upto 10% chash back on air ticket and rail ticket booking. also sir we have reward point system. with which on purchase of worth rupees 1000 using this card, u'll get 2 reward points which u can convert to 10 miles of air travel distance per point. so at the time of air ticket booking u'll not be charged for that much of travel distance. also sir we give u 55 days of period to pay ur credit card bill which none of the banks provides. u'll just need to submit photocopy of ur employee card, photocopy of PAN card, one address proof and one photo. so sir when should i send my person to collect the documents?

me: sorry u were too fast, i didn't get ur scheme. can u repeat please?

बैंकवाले ह्याना काय खायला देतात माहित नाही, तो नक्की पुन्हा तेवढ्याच एनर्जीने सगळ रिपीट करणार

creditcard person:
(पुन्हा पूर्ण स्कीम, पण जरा कमी स्पीडने)

me: hmmmm, sounds interesting

creditcard person: yes sir, infact many of ur colleges have applied for this credit card

me: WHAT?...they didn't told me...thanks man u told me. now i'll ask them. u know we all are good friends, but they never tell me important stuff like this that they have applied for ur credit card

creditcard person: so sir should i send my person today to collect ur documents?

me: i'll definitely go for your card, but first u have to do one thing.....promise me

creditcard person: what?

me: i'll tell u a joke. u have to listen to my joke and have to laugh

creditcard person: yes, certainly sir

येस म्हणण्याशिवाय बिचारा करणार काय, क्रेडिट कार्ड खपतय ना......

me: once santaa invites bantaa for dinner. he says "oye bante aajaa, aaj ghar pe koi nahi hai". when banta goes, he saws a biiiig lock at santa's door.
.
.
.
फोनवर थोडा पॉज

me:
why didn't u laughed?

creditcard person: it was really nice joke sir. so should i send my person today?

me: listen to one more joke

creditcard person: yes, definitely

me: once our santaa and bantaa were playing chess. they kept on playing for hours and hours and hours. 4 hours, 5 hours, 10 hours. afater that santaa gives up and he says to banta...."yar khel khatm karte hai, waisebhi dononke king to mar gaye hai"

creditcard person: really nice joke sir. so should i send........

me: i think u didn't liked my jokes. ok i got...u must be interested in puzzeles...ok then tell me whats an opposite of 'naagpanchami'?

creditcard person: i don't have any idea sir

me: simple......naag dont punch me

creditcard person: so should i send my person?

me: ohhhh sorry i forgot we were talking abt credit card. what did u said ur bank will give 5% cashback on any goods purchase and 10% on ticket booking rite?

creditcard person: that's correct sir, also 2% cashback on any petrol pump

me:
hmmm it doesn't sounds that interesting. and what abt reward points? how many miles of free air travel on each reward point?

creditcard person:
10 miles sir. Also after gaining minimum of 100 reward points u'll automatically get membership of some selected airlines

me: hmmmm

creditcard person: its really great offer sir

me: nooo yaar.......u know, me and my friend are going to launch a new co-operative bank. our bank is offering very special credit card. u'll get 100% cashback on any goods u purchase from any shop infact we will deposit 100 rs to ur bank account on every purchase of 1000 rupees. 100% cashback for any ticket booking and also as a complementary service, our person will come to airport or railway station to welcome and to receive you. If you didnt travel for 3 months by any airline then u'll get one free airticket to any destination within india. Also u can pay ur bills any time. no due date but if u pay within 30 days, u'll get free insurance coverage of 10000 rupees on every bill clearance.
This is called an offer. yes and no docs required. anyways u r sending your person, so i'll send ur card with him. is it ok?

हाहाहाहा.....काय मजा येइल......तो स्वतः तर नाहीच पण इतर बैंक मधल्या मित्रांना पण सांगेल ह्या नंबरवर चुकून पण फ़ोन करू नका.